![]()
नोंदणी करून ऐका, ‘एकं’वरील साहित्य आणि ‘एकोपा’ अंकांची झलक!
Sign up to listen to Aickum audio content and a sampling of Ekopa audio issues.
शहाण्याला शब्दाचा
चपखल हे कोडे नाही तर आपण सर्रास वापरत असलेल्या इंग्लिश शब्दाला मराठीत काय म्हणावे हे ठरवण्याचा प्रयत्न आहे.
आशिश महाबळ यांचे नवे कोडे पाहण्यासाठी येथे जावे: शब्दखूुळ
मराठीचे जतन हा ‘एकं’ चा हेतू आहे.
वर्षानुवर्षे परदेशात राहिल्यामुळे मराठीचा हात आपल्या हातातून सुटतो आहे अशी खंत काहीजणांना आहे. मराठी शाळेत जाऊन मराठी शिकलेल्या ‘देशी’ मुलांना शिकलेली मराठी टिकवायची आहे.
‘आम्हाला वाचायला काय आहे? आम्हाला मराठी बोलायचे आहे, पण घराशिवाय कुठे बोलतां येईल?’ असे त्यांचे प्रश्न आहेत. काहीजणांना बोललेले समजते पण देवनागरी लिपीची सवय सुटल्यामुळे लिहिणे वाचणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘एकं’ ची स्थापना झाली आहे.
ऐका हो ऐका! झालाच!
काय झालाच?‘शब्दयोग’, १५ गुणिले १५ आकाराच्या नियमबद्ध शब्दकोड्याचा समक्ष खेळ! रंगमंचावरून तीन खेळाडूंनी तोंडी खेळलेला!
कुठे? बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विसाव्या अधिवेशनात, ॲटलांटिक सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये
कधी? ऑगस्ट १३, २०२२ सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान
कधी ऐकलं नव्हतं. कसं ऐकणार? हा इतिहासात पहिल्यांदाच ‘एकं’ने सादर केला आहे.
कसा झाला? प्रेक्षकांना आवडला, ‘खूप छान झाला’ हे त्यांनी लगेच सांगितलं.
आम्हाला पाह्यचा आहे – मग इथे टिचकी मारा.
हे शब्दकोड्याचं पुढचं पाऊल जरा लहान मुलाच्या पहिल्या पावलासारखं आहे! आपण आमचे मराठी बांधव, म्हणून आपल्याला कौतुकाने दाखवतों आहोत.
आमची प्रतिक्रिया कुठे कळवायची? – इथे टिचकी मारा.
विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने केलेले
१. ‘एकं’च्या मराठीचे जतन या उद्दिष्टाविषयी सुषमा येरवडेकर यांचे निवेदन
आणि
२. नितिन जोशी यांनी ‘एकोपा’ या नव्या प्रकाशनाविषयी आणि सुषमा येरवडेकर यांच्या नियमबद्ध मराठी शब्दकोड्यांविषयी दिलेला अभिप्राय.
वाचकांच्या प्रतिक्रिया

'मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक वाटते. लोकेच्छेचा दिवा तेवतो आहे हे ...
प्रांजळ पंचकडी, पुणे.
'एकोपा' मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचला. लेख, चित्रे उत्तम. कोडीं मात्र कठीण. क... मा ...ल...!
- शोभा भेण्डे, मुंबई
होती एकतात बुद्धी, विचार,भावनांना प्रेरणा शब्दकोडे, खिरापत, चपखल मेंदूला चालना अखंड करून सेवा, एकताने घेतली निवृत्ती ...
- विजया मराठे, कॅलिफोर्निया.
'एकोपा'ची रूपरेषा बघितल्यावर, त्याचे प्रयोजन केवळ मराठी भाषेचेच ...
- नितीन सुधाकर, पुणे.

एकोपाचा अंक श्रवणीय करण्याची कल्पना स्तुत्य आहे. आम्हाला फार आवडली. विशेषतः ...
प्रतिभा आणि विनायक गोखले, टोरांटो, कॅनडा.

एकोपामध्ये ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही अंगांनी युक्त असे उत्तम लेख आहेत! आपण इथे अमेरिकेत ...
शालिनी सराफ, न्यू जर्सी.

एकोपाचा ह्या वर्षीचा पहिला अंक वाचला. मुखपृष्ठ फारच सुंदर! ...
अनुराधा कुलकर्णी, ब्लू ॲश, ओहायो
एकोपाचा फेब्रुवारी अंक फारच छान आहे. तुमचे या ‘कलाकृती’मागील कष्ट, बुध्दीमत्ता, ...
भाग्यश्री बारलिंगे, मेसा, ॲरिझोना
लता मंगेशकरांचे रेखाचित्र अतिशय उत्तम. शेडिंग न करतां केवळ ...
अरविंद गोरे, पटोमॅक, मेरीलंड

शब्दयोगसाठी वापरलेल्या शब्दकोड्याचे वैशिष्ठ्य असे आहे, की फक्त कांही ठिकाणी 'प' हे अक्षर...
अरुण जतकर, मन्रोविल, पेन्सिल्वेनिया.








